आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केटच्या बिकिनीतील छायाचित्राने खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - महाराणी एलिझाबेथची स्नूषा केट मिडिलटनचे बिकनीतील छायाचित्र प्रसिद्ध केल्यामुळे ब्रिटनचे राज घराणे नाराज आहे. इटालियन गॉसिप मासिक ‘ची’ने ही घोषणा केली आहे. चीने याआधी केटचे अर्धनग्न छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.

केट पतीसोबत कॅरेबियन बेट मस्टिकमध्ये सुटीसाठी गेले आहे. प्रसिद्ध झालेले छायाचित्र या बेटावरील आहे. ची मासिकाने गेल्यावर्षी केटचे अर्धनग्न छायाचित्र छापले होते. त्या वेळी संबंधित जोडपे फ्रान्समध्ये सुटीसाठी आले होते. यानंतर खासगी आयुष्य व प्रसारमाध्यमांची सीमारेषा या मुद्द्यावर वाद सुरू झाला. मासिकाचे मालक द मोनदादोरी समूहाने आपल्या वेबसाइटवर मासिकाचे मुखपृष्ठ अपलोड केले आहे. छायाचित्राचे शिर्षक, केट अ‍ॅँड विल्यम इन मस्टिक, द केली ग्रोज असून त्यावर केटची बिकनीतील छबी आहे. सेंट जेम्स पॅलेसचा प्रवक्ता म्हणाला, मासिकाच्या निर्णयामुळे राज घराण्यातील शाही दांपत्याच्या खासगी आयुष्याच्या हक्कावर गदा येत आहे. येत्या जुलै महिन्यात केटची प्रसूती होणार आहे.