आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kavin Rude Lazy Priminister, Say Daily Telegraph

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केव्हिन रूड हे बिनकामाचे पंतप्रधान, डेली टेलिग्रामने उडवली खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - माध्यमसम्राट रूपर्ट मर्डोक यांच्या मालकीच्या ‘डेली टेलिग्राफ’ या टॅब्लॉईड वृत्तपत्राकडून ऑस्ट्रेलियन पंतप्रधान केव्हिन रड यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असताना रूड हे बिनकामाचे पंतप्रधान आहेत, अशी टीका करणारी मोहीम या टॅब्लाइडकडून राबवली जात असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.


टेलिग्राफच्या गुरुवारच्या अंकात एक छायाचित्र प्रकाशित झाले आहे. त्यात रड यांची तुलना एका जुन्या प्रचंड गाजलेल्या विनोदी टीव्ही मालिकेतील पात्राशी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सरकारमधील सहका-यांचीदेखील टर उडवण्यात आली आहे. 7 सप्टेंबर रोजी देशात निवडणूक होण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेच्या दुस-याच दिवशी टेलिग्राफने रड यांच्या सरकारची हकालपट्टी करा, अशा आशयाच्या मथळ्याखाली लक्ष्य केले होते.


‘संपादनात हस्तक्षेप नाही’
टेलिग्राफच्या संपादकीय कामात हस्तक्षेप करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मजकुराच्या निवडीचा अधिकार संपादनांतर्गत येणारा विषय आहे. त्यामुळे याच्याशी आपला संबंध नाही, असे सांगून रूपर्ट मर्डोक यांनी हात झटकले आहेत. सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले मर्डोक जन्माने ऑस्ट्रेलियन आहेत.


कोण आहे नाझी कमांडर ? : 1965 ते 1971 दरम्यान ‘हॉगन्स हिरोज’ नावाची अमेरिकन टीव्ही मालिका तुफान गाजली होती. दुस-या महायुद्धाच्या काळातील जर्मन छावण्यातील कथा त्यात विनोदी पद्धतीने रंगवण्यात आली होती. त्यात कर्नल क्लिंक नावाचे पात्र होते. ते युद्धापेक्षा प्रत्यक्षात हसवण्यापुरते असल्याचे दाखवण्यात आले होते. नाझी कमांडर कर्नल क्लिंक म्हणजे रड असल्याचे त्यात म्हटले आहे. उपपंतप्रधान अँथोनी अल्बानीस म्हणजे नाझी सार्जंट शुल्टझ् आणि माजी संसद सदस्य क्रेग थॉमसन यांना होगन दर्शवण्यात आले आहे, असे टेलिग्राफने म्हटले आहे.


मर्डोक यांचे हे उद्योग कशासाठी?
ऑस्ट्रेलियातील निवडणुकीत मर्डोक यांनी थेट हस्तक्षेप करण्यामागे त्यांचा व्यावसायिक हेतू असल्याचा आरोप पंतप्रधान केव्हिन रड यांनी केला आहे. लेबर पक्षाचे नॅशनल ब्रॉडबँड नेटवर्क धोरण मर्डोक यांच्या केबल टीव्ही कंपनीला बाधक ठरत असावे, त्यामुळेच त्यांनी लिबरल नॅशनल आघाडीची तळी उचलली आहे, असे बोलही रड यांनी सुनावले आहेत.