आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kayani Left Banglow Due To Terrorist Threaten, Military Pressure

दहशतवाद्यांच्या धमकीमुळे कयानींनी बंगला सोडला,हल्ल्याच्या धोक्यामुळे लष्कराकडून दबाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - निवृत्तीनंतरचे आयुष्य निवांतपणे घालवण्यासाठी माजी लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी यांनी नवीन बांधलेले घर राहायला जाण्यापूर्वीच सोडावे लागणार आहे. दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने लष्कराकडून त्यांच्यावर दबाव वाढला आहे.
नवीन घर सोडून जवानांचा फौजाफाटा असलेल्या घरात राहायला जावे, असा पर्याय लष्कराने कयानी यांना दिला आहे. लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झालेले कयानी देशाच्या लष्करी सेवेत मात्र अजूनही सक्रिय आहेत; परंतु संपूर्ण निवृत्तीचा काळ संरक्षण गृह प्राधिकरण (डीएचए) भागात त्यांचे नवीन घर बांधलेले आहे. भुरकट रंगाच्या दगडांमध्ये त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. लष्करी वसाहतीच्या अगदी शेवटी ते वसलेले आहे. सोअन नदीच्या काठावर हे घर आहे. तो भाग उतरणीवरील आहे. घरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली असली, तरी धोक्याचा विचार करता ही सुरक्षितता अपुरी ठरते, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
घराचे अजूनही काही बांधकाम बाकी आहे. दोन महिन्यांत ते तयार होईल. नॅशनल स्टेडियम कराची (एनएसके) भागात कयानी यांच्या मालकीची जागाही आहे. तेथे शंभरावर अधिका-यांच्या मालकीच्या जागा आहेत. या मुद्द्यावर लष्कराकडून काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही; परंतु भावाला राहण्यासाठी सुरक्षित असे घर हवे आहे,
अशी प्रतिक्रिया कयानी यांचे बंधू ब्रिगेडिअर अमजद यांनी दिली.
लष्करी घरातच मुक्काम
कयानी यांना घर बदलण्याचा सल्ला देण्यात आल्यामुळे त्यांना लष्करी घरातच मुक्कामी राहावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यांना लष्करी विश्रामगृहात हलवण्यात येईल. तेथे डझनावर निवृत्त अधिकारी, दोन माजी लष्करप्रमुख मिर्झा अस्लम बेग, अब्दुल वाहीद ककर हे शेजारी आहेत.