आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 दिवस कडकडीत उपवास करून मधुमेहास पळवले, ब्रिटिश नागरिकाचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - उपवास आहार पद्धतीतून मधुमेहास 11 दिवसांत पळवल्याचा दावा ब्रिटनच्या नागरिकाने केला आहे. ब्रिटिश विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ही आहार पद्धती विकसित केली आहे. रिचर्ड डाउथी यांना नियमित आरोग्य तपासणीदरम्यान टाइप टू प्रकारचा मधुमेह असल्याचे निदान झाले. माझे वजन उंचीच्या प्रमाणात आहे. माझ्या कुटुंबातील अन्य सदस्यांना हा आजार नाही. मी चांगला आहार घेतो. धूम्रपान करत नाही, तसेच गोडही खात नाही, असे 59 वर्षीय डाउथी म्हणाले.


यकृत, स्वादुपिंडावरील मेदामुळे टाइप टू डायबिटीस
स्वादुपिंड व यकृतावर मेद चढल्यामुळे टाइप टू मधुमेह होतो. इन्सुलिन तयार करणे व रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी या अवयवांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. आहार पद्धती विकसित करण्यासाठी या गोष्टीचा विचार करण्यात आला. उपवासाच्या स्थितीइतपत कमी आहार घेतल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्मांक जाळले जातात.


नेमके काय केले?
मधुमेहाच्या मुक्तीसाठी त्यांनी इंटरनेटवर उपाय शोधले. यात त्यांना आठ आठवड्यांत मधुमेह नाहीसा करणार्‍या आहार पद्धतीची माहिती मिळाली. न्यू कॅसल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या आहारात दररोज 800 उष्मांक सेवन करण्यास सांगितले होते.2500 उष्मांक ग्रहण करण्याची माणसाची क्षमता आहे. 800 उष्मांकांमध्ये 600 उष्मांक आहारात बदल करून व 200 उष्मांक पालेभाज्यांतून घेण्याची शिफारस करण्यात आली. त्याचप्रमाणे दररोज तीन लिटर पाणी पिण्यास सांगण्यात आले. मेडिसिन अँड मेटाबॉयलेशन विभागाचे प्रो. रॉय टेलर यांनी आहाराचा तक्ता तयार केला आहे.