आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kenji Goto's Tweet Of Tolerance Goes Viral After Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत जपानी पत्रकार केंजी गोतोचे ट्विट व्हायरल, देश शोकाकुल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो - केंजी गोतो या इस्लामिक स्टेटने शिरच्छेद केलेल्या पत्रकाराचे ट्विट व्हायरल झाली आहे. आयएसने केंजीचा शिरच्छेद केल्याचे जाहीर केल्यानंतर हे ट्विट सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केले जात आहे. ‘तुमचे डोळे बंद करा व संयमाने प्रार्थना करा. क्रोध व आक्रोशाने काहीच साध्य होत नाही. तिरस्कार करणे हा मनुष्याचा स्वभाव नव्हे. निर्णय व न्याय हे केवळ देवाच्या हातात असतात,’ हे गोतोचे चार वर्षांपूर्वीचे ट्विट त्याच्या मरणानंतर वाचले जात आहे. यातून गोतोच्या व्यक्तित्वाचा अंदाज येतो. मुख्य म्हणजे माझ्या अरब मित्रांनी मला हे विचार सांगितले आहेत, असा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. ७ सप्टेंबर २०१० रोजीची ही पोस्ट आहे. एका दिवसात २६ हजार वेळा याला रिट्विट करण्यात आले आहे. ‘माझ्या मुलाचा मृत्यू नीच प्रवृत्तींनी केला असला तरीही त्यातून तिरस्कार पसरू नये,’ अशी इच्छा गोतोची आई जुन्को यांनी व्यक्त केली.

मुलांवर सर्वाधिक माहितीपट
४७ वर्षीय केंजी गोतो हे मुक्त पत्रकार होते. युद्धग्रस्त प्रदेशातील लहान मुलांच्या स्थितीवर त्यांनी सर्वाधिक माहितीपट निर्माण केले होते. जपानी टीव्ही नेटवर्क व आखाती देशांना ते माहितीपट पुरवत होते. १९९६ पासून ते युद्धग्रस्त क्षेत्रांत काम करत होते. केंजी गोतोचा शिरच्छेद करण्यापूर्वी आयएसने जपानी नागरिक युकावा यांनाही ठार केले होते.