आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kenyan Tribal Ritual Circumcision Ceremony Of Girls

महिलांचा आजही केला जातो खतना, आदिवासी समाजातील अघोरी परंपरा, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंपरेच्‍या नावाखाली महिलांवर केला जाणारा अत्‍याचार थांबवण्‍यासाठी केनिया सरकारने तरूण महिलांचा खतना करण्‍यावर निर्बंध लादले आहेत. मात्र आजही केनियात तरूण मुलींचा खतना केला जात असल्‍याचे विदारक चित्र पाहायला मिळते.
मुलगी वयात आली की लग्‍नाच्‍या अगोदर तिचा खतना करण्‍याची पंरपरा या देशात आहे. या परंपरेच्‍या नावाखाली खतना केल्‍याचे प्रकार आजही घडत आहेत. बारिंगो जिल्‍ह्यातील पोकोटा आदिवासी जमातीमध्‍ये तरूण मूलींचा खतना केल्‍याचा प्रकार नूकताच उघडकीस आला आहे.
कसा केला जातो खतना-
तरूण मुलीच्‍या अंगावर पांढरा रंग फासला जातो, त्‍यांच्‍या अंगावर प्राण्‍याची कातडी टाकून एका मोठ्या दगडावर बसवले जाते. ब्‍लेड किंवा काचेचा तुकडा वापरून खतना केला जातो. खतना करत असताना मुलीने केलेला आक्रोश मन हेलावून सोडणारा असतो. मात्र परंपरेच्‍या नावाखाला तरूण मुलीवर अत्‍याचार केला जातो. खतना केल्‍यानंतर वैद्यकीय उपचार मात्र केले जात नाहीत.
केनिया सरकारने या परंपरेवर बंदी घातली आहे. मात्र बंदीनंतरही 70 टक्के मुलींना या आघोरी परंपरेचा सामना करावा लागला आहे. समाचार एजन्‍सी रायटर्सच्‍या फोटोग्राफरला एका अदिवासी मुलीच्‍या पालकाने माहिती दिली आहे. त्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार ही परंपरा हजारो काळापासून चालत आली आहे. मुलीचे लग्‍न करायच्‍या अगोदर अशा प्रकारे खतना करण्‍याची आमच्‍याकडे पंरपरा असल्‍याचे त्‍याने सांगितले.
खतना करण्‍याचा कार्यक्रम या समाजात एखाद्या उत्‍सवासारखा साजरा केला जातो. यावेळी सर्व महिला मद्यपान करतात व आनंद साजरा करतात. यूनिसेफच्‍या आकडेवारीनूसार अाफ्रीका आणि मध्‍ये पूर्वकडील 29 देशामध्‍ये 12 कोटी महिलांचा खतना करण्‍यात आला असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. केनिया सरकारच्‍या कायद्यात खतना करताना महिलेचा मृत्‍यू झाला तर जन्‍मठेपेची शिक्षा दिली जाते. मात्र कायद्याला न घाबरता आदिवाशी आजही पंरपरेच्‍या नावाखाली तरूण मुलींचा खतना करत आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा आदिवासी लोकांच्‍या 'खतना' परंपरेची काही छायाचित्रे...