आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerry: China Must Do More To Resolve North Korean Missile Crisis

उत्तर कोरियासाठी चर्चेची दारे खुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- उत्तर कोरियासोबत चर्चा करण्यास अमेरिकेची तयारी आहे, परंतु त्यासाठी उत्तर कोरियाने अगोदर योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे.

अण्वस्त्ररहित आणि विश्वासार्ह शांती चर्चेसाठी अमेरिकेची तयारी आहे; परंतु त्यासाठी उत्तर कोरियाने अणू कार्यक्रमाविषयी असलेली कटिबद्धता दाखवली पाहिजे, असे केरी म्हणाले. आशियातील तीन देशांचा दौरा आटोपून केरी यांनी सोमवारी पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांची भेट घेतली. या मुद्द्यावर आमची एकजूट आहे. त्यावर आम्हाला कसलीही शंका नाही. उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम केवळ शेजा-यांनाच नव्हे, तर त्यांच्या नागरिकांनाही संकटात टाकणार आहे. जगासाठी युद्ध चांगले नाही. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. दोन दिवसांपूर्वी चीनने आपली कडक भूमिका दर्शवणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे अण्वस्त्रविरोधी प्रयत्नासाठी ही बाब फायदेशीर आहे, असे केरी म्हणाले.