आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kerry In Baghdad To Discuss Iraq Crisis, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचे परराष्‍ट्रमंत्री केरी यांचे बगदादमध्‍ये आगमन, इराकच्या सद्य‍:स्थितीवर करणार चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे परराष्‍ट्रमंत्री जॉन केरी - Divya Marathi
अमेरिकेचे परराष्‍ट्रमंत्री जॉन केरी
बगदाद - इराकमध्‍ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने चालव‍लेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे प‍रराष्‍ट्रमंत्री जॉन केरी यांचे बगदादमध्‍ये सोमवारी(ता. 23) आगमन झाले. सध्‍या देशात दहशतवाद्यांनी चालवलेल्या कारवाईंबाबत केरी इराकच्या सरकारशी बोलणार आहेत.

प्रशासकीय अधिकारी, पंतप्रधान नुरी अल-मलिकी आणि संसदेचे सभापती उसमा अल- न‍ुजैफी यांची केरी भेट घेणार आहेत,असे इराकच्या परराष्‍ट्रमंत्रालयातील अधिका-याने सांगितले.
केरी यांनी या भेटीची कोणतीही पूर्व सूचना दिलेली नव्हती. त्यांनी तत्पूर्वी रव‍िवारी कैरो आणि जॉर्डनचा दौरा केला.

दहशतवाद्यांनी इराकच्या नव्या प्रदेशावर नियंत्रण मिळवण्‍यास सुरूवात केली आहे. त्यात जॉर्डन-इराकच्या सीमेचाही समावेश आहे. मागील आठवड्यात बंडखोरांनी मसूल शहर ताब्यात घेतले असून ते आता बगदादच्या आसपास असलेल्या शहरांवर नियंत्रणाखाली आणत आहे.