फनोम पेन्ह - कंबोडियाच्या दोन सर्वोच्च नेत्यांना बुधवारी( ता.7) न्यायालयाने 1970 मधील मानवता विरोधी गुन्ह्याबाबत दोषी ठरवले आहे. संयुक्त राष्ट्राच्या वॉर क्राइम कोर्टने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खियू सैंफन( 83) आणि निऑन चिया ( 88) या दोन आरोपींनी 1975 ते 1979 पर्यत खमेर शासनाच्या काळात 20 लाख लोकांची हत्या केल्याचे सिध्द झाले.
न्यायालयाच्या निर्णयाबाबत दोन्ही नेत्यांच्या चेहरावर कोणताही फरक पडल्याचे दिसत नव्हते. या निणर्याविरूध्द त्यांना अपील करू शकतात. वर्ष 1975-79 मधील खमेर रूज शासनाच्या काळात कंबोडियाला कृषीप्रधान देश बनवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर शहरांतून लोकांना जबरदस्तीने ग्रामीण सहकारी संस्थांमध्ये टाकण्यात आले. यात लाखो लोक विस्थापित झाले. या दरम्यान अधिक काम, भूक, अनारोग्य याने 20 लाख लोकांचा मृत्यू झाला.यासाठी सैंफन आणि चिया यांना जबाबदार धरण्यात आले.