आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसपेक्षाही खोरासन कट्टरपंथीय गटाचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेने सिरियामधील दोन दहशतवादी गटांच्या तळांवर हवाई हल्ले केले होते. या गटांच्या सामर्थ्यावर बारकाईने नजर ठेवणे महत्त्वाचे आहे. या हल्ल्यांपूर्वी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड ग्रेटर सिरीया (आयएसआयएस)याच अतिरेकी संघटनाच्या ठिकाणांवर चर्चा होत होती. या संघटनेने जूनमध्ये इराकमधील मोठे शहर मोसुलवर कब्जा केला आहे. या अतिरेक्यांनी इराकमधील कुर्द क्षेत्रातील इरबिल शहराची नाकाबंदी केली होती. त्यामुळे हा अतिरेकी गट जगाच्या रडारवर आला. मात्र सुन्नी कट्टरपंथीय गट खोरासनचा विशेष उल्लेख करण्यात आला नाही. हे दोन्ही गट अल-कायदाच्याच शाखा आहेत.
आयएसआयएसचा संस्थापक अबू मुसाब अल जरकावी याची जिहादी रणनीती ओसामा बीन लादेनपेक्षा वेगळी आहे. ओसामाच्या निशाण्यावर पाश्चात्य देश होते. जारकावी याने शिया मुस्लिमांना आपले लक्ष्य केले आहे. ओसामाचा शिया पंथीयाविरुद्ध आघाडी उघडण्यास विरोध होता.
या वर्षीच्या सुरुवातीपासूनच आयएसआयएस आणि अल कायदाने स्वतंत्र मार्गांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने आयएसआयएसच्या कारवायांना माध्यमांसमोर आणले. ओबामा प्रशासनाने त्यांना धडा शिकवण्यासाठी सुन्नीबहुल देशांची आघाडी उघडली आहे. आयएसआयएसने कधीच दीर्घ मुदतीच्या योजना आखल्या नाहीत. कोणतेही गुप्त अभियान चालवले नाही. नॅशनल काउंटर टेरेरीझम सेंटरचे संचालक मॅट ओलसन यांच्या म्हणण्यानुसार,आयएसआयएस अमेरिकेवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा कोणताच पुरावा नाही.परिस्थिती बदलण्याच्या शक्यता निश्चितच आहेत. आयएसआयएस कडून जमिनीवर अधिकार स्थापणे, तेलाच्या विक्रीतून पैसा कमावणे, बँकेत दरोडा टाकणे व खंडणी वसूल करण्याच्या मोहिमा हाती घेण्यात येत आहेत. त्याचा इराक व सिरियाला भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यूरोप, अमेरिकेतून जिहादींना या संघटनेत सामील करून घेण्यात येत आहे.
खोरासन गटचे सामर्थ्यही वाढत आहे. संघटना अल कायदा प्रमाणेच कार्यरत आहे. लादेनच्या कार्यशैलीशी या संघटनेचे प्रचंड साम्य आहे. बिन लादेनने १९९६ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेविरोधी युध्दाची घोषणा केली होती.