आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thailand Police Arrested Killer Of Ex Punjab Chief Minister

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या खुनातील आरोपीला थायलंडमध्ये अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्ये प्रकरणातील एका आरोपीला थायलंड पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी एका बॉम्बस्फोटात बेअंत सिंग यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी या स्फोटात इतर 15 जणांनीही प्राण गमावले होते.

1995 मध्ये झालेल्या या स्फोटा प्रकरणी सहा शीख दहशतवाद्यांना आरोपी ठरवण्यात आले होते. त्यापैकीच एक असलेल्या गुरमित सिंग याला थायलंडमध्ये अटक करण्यात आली आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही गुरमित हा 2004 मध्ये तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. 2007 साली या प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

थायलंडचे पोलिस प्रवक्ते लेफ्टनंट जनरल थावोर्नसिरी यांनी सांगितले की, गुरमित सिंग हा ऑक्टोबरमध्ये थायलंडमध्ये आला होता आणि चोनबुरी येथून त्याला सोमवारी अटक करण्यात आली होती. लवकरच भारताकडे त्याचे प्रत्यर्पण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बेअंतसिंग यांची एका आत्मघातकी बॉम्ब हलल्यात हत्या करण्यात आली होती.
पुढील स्लाइडवर वाचा, बेअंतसिंग यांच्याबाबत...