आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • King Mansa Musa Of Mali Named Richest Person Of All Time

PHOTOS: अबब इतकी संपत्ती, ही आहे मानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत लोकांचा विषय निघतो तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम बिल गेट्स, वॉरेन बफेट आणि कार्लोस स्लिम यांच्यासारख्यांची नावे येतात. मात्र, आपल्यापैकी फार थोड्या लोकांना माहित असेल की जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत माणूस हा गरीब समजल्या जाणा-या अफ्रिका खंडात राहत होता. होय, अफ्रिका खंडातील बहुतेक देश अंतर्गत यादवीने ग्रस्त झालेले आहेत. धर्म आणि जातीवर आधारित नायजेरिया, माली, रवांडा, युगांडा आणि सूदानसारख्या देशात रक्ताचे पाटच वाहत असतात. अशा या प्रदेशात 13 व्या शतकात माली साम्राज्याचा एक राजा मंसा मूसा (प्रहिला) राज्य करीत होता. सेलेब्रिटी नेटवर्थ वेबसाईटच्या माहितीनुासर, या राजाकडे 400 बिलियन डॉलर इतकी संपत्ती होती. आजचे मूल्य पाहता हा राजा पृथ्वीवरील मानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत मानला जातो.
1331 मध्ये मृत्युवेळी या राजाकडे त्याची व्यक्तिगत संपत्ती 400 बिलियन डॉलर ( म्हणजे आजच्या भारतीय चलनानुसार 24615980000000 रुपये इतकी) होती. हे असे आहे जसे मोजून मोजून तुम्ही संपून जाल. या राजाचा देश संपूर्ण जगातील निम्म्यापेक्षा जास्त सोन्याचे उत्पादन करायचा. त्याने खूप मोठ्या मोठ्या मशिदी बनवल्या ज्या आजही उभ्या आहेत. मूसाच्या मृत्यूनंतर त्याचा व्यवसाय व संपत्ती पुढील पिढी सांभाळू शकली नाही. याबाबत सांगितले जाते की, विदेशी फौजांचे आक्रमण व अंतर्गत युद्धात या राजाच्या संपत्तीची लुट करण्यात आली.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, मूसाशी संबंधित घटना व माहिती....