आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiss Of Life: Dramatic Pic Of Woman Saving 5 month old Stuck In Traffic Bews In Marathi

किस ऑफ लाइफ : तोंडाद्वारे श्वास देऊन तान्हुल्याचे प्राण वाचवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - 37 वर्षीय इंटेरियर डिझायनर पामेला अमेरिकेतील मियामी भागातील महामार्गावरून कारने जात होत्या. मागील सीटवर त्यांचा तान्हुला पुतण्या झोपला होता. काही वेळानंतर तो अचानक शांत झाल्याचे पामेला यांच्या लक्षात आले. बघितले तर त्याचा श्वाच्छोश्वास बंद पडला होता. पामेला यांनी लगेच रुग्णवाहिका बोलावली परंतु वाहतुकीच्या कोंडीमुळे रुग्णवाहिकेला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास बराच वेळ लागला असता. बाळाला वाचवण्यासाठी पामेला यांनी लगेच ‘पॅसिव्ह ब्रिदींग’ देने सुरू केले. बर्‍याच प्रयत्नानंतर बाळाच्या शरीरात हालचाल जाणवली आणि त्याचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना पामेला यांच्या कारमागून कार चालवत असलेल्या अल डियाझ नामक व्यक्तीने कॅमेर्‍यात कैद केली.

सीपीआर तंत्रज्ञान
‘माऊथ टू माऊथ’ श्वसन देण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत सीपीआर (कार्डिओ पलमोनेरी रिससिटेशन) म्हटले जाते. अकस्मात हृदयगती थांबल्यास त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी 1954 मध्ये अमेरिकन डॉक्टर जेम्स ईलम यांनी ही प्रक्रिया अस्तित्वात आणली.