आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Knife Attack In China News In Marathi, Crime, Divya Marathi

चीनच्या बाजारपेठेत हल्लेखोरांकडून पुन्हा चाकूहल्ला; 3 ठार, एक गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या बाजारपेठेत झालेल्या चाकूहल्ल्यात तीन नागरिक मृत्युमुखी पडले असून एक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार मारले असून एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन आठवड्यांमधील चाकूहल्ल्याची ही दुसरी घटना आहे.
हुनान जिआओटोंग या स्थानिक रेडिओ स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, चांगशा प्रांतातील दक्षिणेकडील एका शहरात या प्रमाणेच झालेल्या चाकूहल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे.
नैऋत्य चीनमधील एका रेल्वे स्टेशनवर दोन आठवड्यांपूर्वी असाच चाकूहल्ला झाला होता. यात 29 नागरिक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यात झिनजिंग प्रांतातील पश्चिमेकडील मुस्लिम विभाजनवाद्यांचा हात असल्याचे चीनच्या सरकारने सांगितले होते.
आज झालेल्या चाकूहल्ल्यातील एकाला पोलिसांनी ठार मारले तर एकाला पकडण्यात यश आले आहे. दरम्यान, दोन हल्लेखोर पळण्यात यशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.