आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - चीनच्या दक्षिण पश्चिम(वायव्य) भागातील कुनमींग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 33 जणांचा मृत्यू तर 136 लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.
सुत्रांनी सांगितले, की शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात दहशवाद्यांनी रेल्वेस्थानकावर चाकूहल्ला केला. हल्यामागे कोण्ाता उद्देश होता याविषयी माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. घटनास्थळावरील एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी काळे कपडे परिधान करून आले होते. त्यांच्यासोबत चाकूसारखे मोठे हत्यार होते. दहशतवाद्यांनी लोकांवर बेछुट हल्ला केला. हल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले. तर स्थानीक टी. व्ही. चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रपतींद्वारे या घटनेचा निषेध
वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेचा राष्ट्राध्यक्ष शी जिंपिंग यांनी निषेध केला आहे.
घटनास्थळाचे अधिक छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.