आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्व \'फर्स्ट लेडीज\'पेक्षा सरस आहेत चीनच्या पेंग लियुऑन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील लोकांच्या नजरा केवळ त्यांच्या राजकीय नेत्यांकडेच लागलेल्या नाहीत तर, चीनची फर्स्ट लेडी पेंग लियुऑनवरही खिळलेल्या आहेत. इतर देशातील फर्स्ट लेडीं पेक्षा पेंग काकणभर सरस आहेत. सौंदर्य, लोकप्रियता आणि प्रसिद्धीमध्ये त्या पतीपेक्षाही एक पाऊल पुढे आहेत. चीनमध्ये राजकीय नेत्यांच्या पत्नी या त्यांच्या कामासाठी सहसा ओळखल्या जात नाहीत तिथे, पेंग यांनी इतिहास निर्माण केला आहे. देशातील महिलांसाठी त्या प्रेरणास्त्रोत ठरत आहेत.

पेंग या चीनमधील प्रसिद्ध फोक सिंगर देखील आहेत. पहिल्यापासून त्यांना त्यांचे पती आणि नुकतेच राष्ट्राध्यक्ष झालेल्या शी जीनपिंग यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. गेल्या २४ वर्षांपासून त्या सरकारी टीव्हीवर प्रसारित केल्या जाणा-या नववर्षाच्या कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करत असतात. मात्र एवढेच त्यांचे कार्यकर्तृत्व नाही. चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये सर्वात कमी वयाच्या मेजर जनरल म्हणूनही त्या होत्या. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एचआयव्ही-एड्स आणि टीबीच्या विरोधातील अभियानात त्या सदिच्छा दूत राहिल्या आहेत. त्यांच्या नावाचा अर्थ सौंदर्य असा होतो.