आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दोघांच्या कल्पनाशक्तीचे नाव गुगल, जाणून घ्या संस्थापकांसंबंधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलचा आज वाढदिवस आहे. 2005 मध्ये गुगलने 27 सप्टेंबर ही गुगलच्या वाढदिवसाची अधिकृत तारीख असल्याचे जाहीर केले. त्याआधी गुगला बर्थ डेट अनेकदा बदलली आहे. सुरवातीला गुगलने 4 सप्टेंबर हा कंपनीचा स्थापन दिवस असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी गुगलच्या जन्मदिनाच्या अनेक तारखा बदलल्या आहेत त्या सर्व सप्टेंबर महिन्यातीलच आहेत, हे विशेष. 4, 7, 15, 26 सप्टेंबर अशा गुगलच्या जन्मतारखा बदल राहिल्या आहेत. 2005 मध्ये त्यांनी 27 सप्टेंबर ही गुगलची अधिकृत जन्मतारीख असल्याचे निश्चित केले.

27 सप्टेंबर 2005 पासून गुगल त्यांच्या होम पेजवर आकर्षक डुडल तयार करत आले आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुगल कँडी गेम डुडल होमपेजवर तयार केले होते.
गुगलचे निर्माते दोन तरुण चेहरे आहेत. सर्गी ब्रिन आणि लॅरी पेज या गणिततज्ज्ञ आणि उद्योजकाने मिळून गुगलचा शोध लावला. गुगलच्या वाढदिवसानिमीत्त जगाला गुगलची देण देणार्‍या या दोन्ही तरुणांबद्दलची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या अधिक माहिती...