आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Terrorist Groups Symbols And Flags Database

दहशतवाद्यांच्या झेंड्यात लपलेला असतो अल्लापासून स्वरक्षणापर्यंतचा जिहादींचा संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियातील मार्टिन प्लेस येथील लिंड्ट चॉकलेट कॅफेमध्ये सुसाइड बेल्ट घातलेल्या एकाने 40 लोकांना ओलीस ठेवले आहे. यात एकही भारतीय व्यक्ती नाही. ओलीस ठेवलेल्या 40 पैकी तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. कॅफेच्या खिडकीतून काळे झेंडे दाखवले जात आहेत. या झेंड्यांच्या रंगाच्या आधारावर हा दहशतवादी हल्ला असल्याचे मानले जात आहे. झेंड्यावर 'शहादा मोहम्मद' असे लिहिलेले आहे. याचा अर्थ 'इस्लामवर विश्वास ठेवणारे' असा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जगात अनेक दहशतवादी संघटना असून त्यांचे विविध रंगांचे झेंडे आहेत. त्यांच्या झेंड्याचे रंग आणि त्यावरील चिन्हांवरुन त्यांचे विचार आणि त्यांचा उद्देश व ध्येय याची माहिती मिळते.
झेंड्यावरील चिन्ह आणि अक्षरांचा अर्थ
- संघटनेचे नाव - इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल शाम
- ऑपरेशन एरिया - इराक, सीरिया
- नेता - अबु बकर अल बगदादी
झेंड्यावरील संदेश
-आयएसआयएसच्या झेंड्यावर अरबी भाषेत काही अक्षरे लिहिलेली आहेत. या संघटनेचा उद्देश आहे, 'सुरक्षीत राहाणे आणि प्रसार करणे' .
- त्यांच्या संघटनेच्या काळ्या झेंड्यावर वरच्या बाजूला लिहिलेले आहे, 'There is no god but God'. झेंड्याच्या मधोमध पांढर्‍या गोलाकार पार्श्वभूमीवर लिहिलेले आहे, 'मोहम्मद रसूल अल्लाह'. ही मोहम्मद पैगंबर साहेबांकडून पत्रांवर उमटवली जाणारी मोहर होती.
- खालच्या भागात लिहिले आहे, 'इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल शाम'.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या दहशतवादी संघटना आणि काय म्हणतात त्यांचे झेंडे