आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Reason Of Why Porn Film Is More Attract To Human

तरूणांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनाच का आवडतात पोर्न फिल्म, काय आहे कारण, जाणून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्न पाहाणे सर्वांनाच आवडते. मग पुरुष असेल किंवा महिला. तरुण असतील नाही तर वृद्ध. सर्वजण पोर्न पाहातात. इंटरनेटवर सर्वाधिक काही सर्च केले जात असेल तर त्या पोर्न साइट सर्च केल्या जातात, असेही समोर आले आहे. इंटरनेटवर पोर्न फिल्म पाहून ब्रिटनमधील एका 10 वर्षांच्या मुलाने सात वर्षांच्या मुलीवर काही दिवसांपूर्वीच बलात्कार केल्याची घटना ताजी आहे. ही काही पहिली घटना नाही. पोर्न फिल्म पाहून अनेक जण लैंगिक अत्याचार करतात. संपूर्ण जगात पोर्नचे व्यसन वाढत चालले आहे. ही एक सामाजिक समस्या बनत चालली आहे.
पोर्नची समस्या नव्याने उद्भवली असे नाही. कित्येक वर्षांपासून समाजात पोर्नचे अस्तित्व आहे. प्रिंटींग प्रेसच्या शोधानंतर अश्लिल कथा संपूर्ण जगात छापल्या जात होत्या. याची फार मोठी बाजारपेठ अस्तित्वात होती आणि सध्याही आहे. रंगित छपाईचे तंत्रज्ञान विकसीत झाल्यानंतर तर पोर्न मॅग्झीन मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागल्या. त्यासोबतच पोर्न फिल्म इंडस्ट्रीही तयार झाली. असे साहित्य आणि चित्रपटांवर अनेक देशांमध्ये बंदी घातलेली आहे, तरीही लपून-छपून यांची विक्री केली जाते.
इंटरनेट सर्वसामांन्याच्या आवाक्यात आल्यानंतर तर जगभर याचा 'तहलका' सुरु झाला आहे. आज हे साहित्य सहज आणि मोफत उपलब्ध होत आहे. याच्या वाईट परिणामांबद्दल मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ गंभीर चर्चा करीत आहेत. पोर्नचे व्यसन ही मोठी समस्या बनत चालली आहे. यापासून मुक्ती मिळण्यासाठी अनेक देशांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरु झाले आहेत. याठिकाणी पोर्न का पाहिले जाते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या सविस्तर...