आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know Your Rights: What To Do If You're Stopped By Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेमध्ये अटकेशिवाय मोबाइल तपासण्यास बंदी, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पोलिस अटक केल्याशिवाय एखाद्याचा मोबाइल फोन तपासू शकत नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशी तपासणी संबंधित व्यक्तीच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन करणारी आहे. हा निकाल खासगी बाबींचा पुरस्कार करणार्‍या लोकांचा विजय मानला जातो. मोबाइल फोनमध्ये अनेक अमेरिकींचे खासगी आयुष्य बंदिस्त असते, असे न्यायालयाने सांगितले. दोन जणांच्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला. संबंधित याचिकाकर्त्यांना सुरुवातीस अटक करण्यात आली नव्हती. मात्र, त्यांच्या मोबाइलमधील कंटेंटच्या आधारे त्यांना दोषी ठरवले होते. सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स म्हणाले, मोबाइल फोन तपासायचा असेल, तर त्याची अटक आवश्यक होती. वॉरंट बजावण्याआधी संशयिताविरुद्ध पुरावे असल्याचे सिद्ध करावे लागते.
90 टक्के लोकांकडे मोबाइल
अमेरिकेत जवळपास 90 टक्के लोकांकडे मोबाइल फोन आहेत. अटकेशी संबंधित एफबीआयच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये 1.2 कोटी लोकांना विविध आरोपांखाली अटक करण्यात आली होती.