आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका : उपाध्यक्षपदासाठी कोंडोलिसा राइस यांच्या नावाची चर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक मिशेल ओबामा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. व्हाईट हाऊसमधील पोलिसांच्या ताफ्यात काम करणार्‍या एका पोलिस अधिकार्‍याकडून ही धमकी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. धमकीनंतर वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी कथित धमकी देणार्‍या पोलिसाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या वक्तव्याचे स्वरूप पाहिले जात आहे.

उपराष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या शर्यतीत राईस
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार म्हणून कोंडोलिसा राइस यांच्या नावाची चर्चा सध्या होत आहे. राष्ट्राध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असलेले मिट रॉमनी यांच्या यादीत राइस यांचे नाव आहे. राइस यांचे नाव अचानक आल्याने राजकीय वतरुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी रॉब पोर्टमन, पॉल रॅन यांचीही नावे संभाव्य यादीत समाविष्ट असतील, असे वृत्तातून म्हटले आहे. राइस यांचे नाव उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढे आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात राइस यांच्याकडे परराष्ट्र खात्याचे मंत्रीपद होते. मुळच्या आफ्रिकन-अमेरिकन असलेल्या राइस यांना त्यांच्या वंशाचा देखील फायदा मिळू शकतो.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या टर्ममध्ये आपण जी कामे केली, त्या विषयी जनतेशी अपेक्षित संवाद साधला नाही. जे केले. ते सांगू शकलो नाही. संवादात आपण कमी पडलो. ही आपली पहिल्या टर्ममधील चूक असल्याची कबुली बराक ओबामा यांनी दिली आहे.
घुसखोर बेरोजगारांना ओबामा यांचे अभय
ओबामा झोपले चक्क व्हरांड्यात
राष्ट्राध्यक्ष निवडणूक : ओबामा विरुद्ध रॉमनी फायनल