आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिएटलच्या सिटी कौन्सिलवर क्षमा सावंत यांची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - मूळ भारतीय क्षमा सावंत (41) यांची सिएटलच्या सिटी कौन्सिलवर निवड झाली आहे. देशभरात ज्या मोजक्या सोशालिस्टची निवड झाली त्यात क्षमा यांचा समावेश आहे. 1 जानेवारीपासून त्या स्थानिक कौन्सिलमध्ये ‘सोशलिस्ट अल्टरनेटिव्ह पार्टी’चे प्रतिनिधित्व करतील.
समाजवाद हाच लोकशाहीचा खरा मार्ग असल्याचे सावंत मानतात. ज्येष्ठ डेमोक्रॅट सदस्याला पराभूत करून त्यांनी ही जागा 3,100 मतांनी जिंकली. 20 वर्षांपूर्वी अमेरिकत स्थलांतरित झाल्या तेव्हा या देशात लोकांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले. समाजवादी विचारांनी भारावलेल्या सावंत यांनी पुढे विषमता संपवण्यासाठी कार्य सुरू केले. यातूनच अमेरिकेच्या राजकीय क्षितिजावर नव्या महिला नेत्याचा उगम झाला आहे.