आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kurdish Female Fighter Launches Suicide Attack On Islamic State Militants And Other Killed Herself To Avoid Being ISIS Hostage

IS च्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कुर्द महिला फायटर बनली सुसाइड बॉम्बर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कुर्द महिला फायटर सिलेन ओजाल्प. दहशतवाद्यांनी घेरल्यानंतर तिने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती)

कोबान- इस्लामिक स्टेटच्या (IS) दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीरियातील कुर्दिश महिला योद्धांची फौज सज्ज झाली आहे. कुर्द महिला 'सुसाइड बॉम्बर' बनून IS च्या दहशतवाद्याचा नायनाट करण्‍यासाठी जीवाची बाजी लावली आहे.

एका महिला फायटरला ISच्या दहशतवादींनी घेरल्यानंतर तिने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका महिलेने 'सुसाइड बॉम्बर' बनून जवळपास 10 दहशवाद्यांचा खात्मा केला आहे.

पहिली घटना 19 वर्षीय कुर्द महिला फायटर सिलेन ओजाल्प हिच्याशी संबंधित आहे. सिलेन हिने इस्लामिक स्टेट (IS) च्या दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वी स्वत:वर गोळी झाडून जीवाची बाजी लावली.

सिलेन ही सीरियातील कोबेनमध्ये ISIS च्या दहशतवाद्यांशी युद्ध करत होती. परंतु तिला दहशतवाद्यांनी चारही बाजुंनी घेरले. अखेर तिने स्वत: च्या बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

दरम्यान, गेल्या महिन्यात सिलेन हिने 'बीबीसी'ला मुलाखत दिली होती. ISIS च्या विरोधात सुरु झालेल्या युद्धाची तिला कोणतीही भिती वाटत नसल्याचे त‍िने म्हटले होते. सिलेनने अंतिम क्षणापर्यंत दहशतवाद्यांशी सामना केला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सुसाइड बॉम्बर बनून या महिला सैन‍िकांनी ISच्या 10 दहशतवाद्यांचा केला खात्मा....