(इराकच्या सुलेमानिया मिल्ट्री कॅम्पमध्ये सैन्यासोबत प्रशिक्षण घेताना कुर्द महिलांचा गट)
आंतरराष्ट्रीय डेस्क –
इराक आणि सीरियामध्ये आयएसआयएसने युध्द पुकारले आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहेत. तसेच दुसरे देशही यांची मदत करत आहेत. ISIS च्या सतत वाढत असलेल्या प्रभावाला पाहता इराकमध्ये कुर्दिश यांनी महिलांची फौज तयार केली आहे. मध्य पूर्वच्या इतर शेजारील देशांच्या उलट पेशमेर्गा (कुर्दांची सेना) महिलांना सैन्यामध्ये भरती करण्याची परवानगी देत आहे.
कुर्द महिला केवळ या सैन्याचा भागच बनणार नाहीत, तर ते
आपल्या पुरूष साथीदाराबरोबर शत्रुचा सामनाही करणार आहे. पेशमेर्गा येथे महिलांना पुढे जाण्याचे स्वातंत्र्य आहे. येथे त्या सर्वात मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतात. या महिलांना तयार करण्यात मिलट्री फोर्सची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. मिलिट्रीसोबत घेतलेले प्रशिक्षण आणि संघटनेकडून महिलांना शिक्षण देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात येतो.
पुढील स्लाईडमध्ये आम्ही तुम्हाला कुर्द महिलांच्या सैन्याचे फोटो दाखवणार आहोत, या महिला ISIS चा समाना करण्यासाठी कठीण परिश्रम घेत आहे. ISIS च्या विरोधआत युद्ध करण्याआगोदर या महिला सैन्यासोबत प्रशिक्षण घेत आहेत.
पुढे पाहा, ISIS च्या दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण घेताना कुर्द महिला