आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 वर्षीय कुश शर्मा ठरला ‘स्पेलिंग बी’चा विजेता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - तब्बल 95 फेर्‍या चाललेल्या तुंबळ मौखिक द्वंद्वयुद्धानंतर अखेर जजेसकडील शब्दभांडार संपुष्टात आले आणि कुश शर्मा हा भारतीय वंशाचा 13 वर्षीय विद्यार्थी ‘स्पेलिंग बी’ या अमेरिकी स्पर्धेचा विजेता ठरला.

सातव्या वर्गात शिकणार्‍या कुश शर्माने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर अवघडातील अवघड शब्दांच्या स्पेलिंग पटापट सांगून जजेसनाही बुचकाळ्यात टाकले. कुशने पाचव्या वर्गात शिकणार्‍या सोफिया हॉफमनचा पराभव केला. सोफियाने stifling या शब्दाचे स्पेलिंग चुकीचे सांगितले आणि ती स्पर्धेबाहेर झाली.

दोघांमध्ये चाललेल्या स्पेलिंगच्या तब्बल 28 फेर्‍यामंध्ये अनेक अवघड शब्दांचे स्पेलिंग विचारण्यात आले. कुशने 29 व्या फेरीत definition या शब्दाचे अचूक स्पेलिंग सांगितले आणि मिसुरीच्या वार्षिक स्पेलिंग बी स्पर्धेचा तो विजेता ठरणार यावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या महिन्यात सोफिया आणि कुशमध्ये 66 फेर्‍या झाल्या होत्या.