आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेनला दडवण्याचे नापाक काम लष्कर, आयएसआयचे; पाक सरकारची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कराचा गलथानपणा व दुर्लक्षामुळे अल-कायदा संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन 9 वर्षे अबोटाबादमध्ये दडून बसला, असा निष्कर्ष पाकिस्तानी सरकारने काढला आहे. आयएसआय-लष्करावर ठपका ठेवल्यामुळे डिसेंबर महिन्यात आलेला पाकिस्तान सरकारचा हा अहवालही गेले सहा-सात महिने दडपून ठेवला होता. एका परदेशी वृत्तवाहिनीने हा अहवाल फोडला.


लादेनचे पाकिस्तानात दडून बसणे आणि अमेरिकेने त्याला शोधून करणे या दोन्ही गोष्टी देशाचे लष्कर व आयएसआय यांचे ‘सामूहिक अपयश, अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमता’ याचा परिणाम आहे, अशा शब्दांत सरकारच्या अहवालात टीका करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी 2 मे 2011 रोजी धडाकेबाज कारवाई करीत लादेनचा खात्मा केला होता. दरम्यान, लादेनप्रकरणी शिक्षा देण्याची घाई करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तान सरकारने दिली आहे. अहवालातील माहिती जाहीर करण्याचा अधिकार केवळ सरकारचा आहे; परंतु ही माहिती कोणी फोडली याचा तपास करण्यात येईल, असे माहिती मंत्री परवेझ रशीद यांनी सांगितले.


पाशांची पाने गायब
अहवालाच्या 197 व्या पानावर लेफ्टनंट जनरल तथा आयएसआयचे तत्कालीन प्रमुख अहमद शुजा पाशा यांचे जबाब होते, परंतु ते अहवालाच्या प्रसारमाध्यमाकडे आलेल्या प्रतीमध्ये दिसून आलेले नाहीत. त्यामुळे पाशा यांनी आयएसआयची भूमिका नेमकी कशी मांडली याचा तपशील समजू शकत नाही.


अबोटाबाद आयोग काय आहे?
सरकारने लादेन पाकिस्तानात कसा दडून बसला होता, यामागील कारण शोधण्यासाठी अबोटाबाद आयोगाची स्थापना केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश जावेद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचा या आयोगात समावेश आहे. या आयोगाने आपला अहवाल सोपवला आहे.


337 पानी अहवाल
200 साक्षी-पुरावे

जवाहिरी पाकिस्तानात ?
लादेननंतर अल-जवाहिरीदेखील पाकिस्तानात दडून बसल्याचे सांगितले जाते. जवाहिरी हा अल-कायदाचा म्होरक्या बनला असून त्याच्या इशा-यावरच दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत.