आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गागा ट्विटरवर अव्वल, जेसिकाची शिशू संगोपनावर वेबसाइट !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पॉप स्टार लेडी गागाची ट्विटरवरील लोकप्रियता प्रचंड वाढली असून तिच्या अकाउंटला फॉलो करणा-यांची संख्या 18 दशलक्षच्या घरात पोहोचली आहे. याबरोबरच ती अव्वल स्थानी पोहोचली आहे. दुसरीकडे अभिनेत्री जेसिका अल्बाने शिशू संगोपनाची वेबसाइट सुरू केली आहे.
25 वर्षीय गागाने हे स्थान खूपच कमी वेळेत गाठले आहे. या सोशल नेटवर्किंगवरील तिची निकटची प्रतिस्पर्धी असलेल्या जस्टिन बायबर हिला तिने पिछाडीवर टाकले आहे. जस्टिनच्या चाहत्यांची संख्या 16 दशलक्ष एवढी आहे. हा आकडा एवढा असू शकतो, यावर माझा तरी विश्वास बसत नाही. काही दिवसांपूर्वी मी या गोष्टीची कल्पनाही करू शकत नव्हते, अशी प्रतिक्रिया लेडी गागाने दिली आहे. दुसरीकडे हॉलीवूडच्या दुस-या तारकाची बातमी आहे. जेसिका अल्बाने शिशू संगोपनासाठी मार्गदर्शन
करणा-या एका वेबसाइटची सुरुवात केली आहे.
मुलांसाठी बाजारात असलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे प्रमाण असते. या संबंधी पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या वेबसाइटच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. 30 वर्षीय अल्बाने स्वत:च्या मुलासाठी बाजारातून काही खाद्य पदार्थ आणले. परंतु त्यात रसायन आढळून आल्याने तिला धक्का बसला. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याचा विचार तिच्या मनात आला. त्यानुसार अलीकडेच तिने ही वेबसाइट सुरू केली आहे. या संकेतस्थळाचे नाव हॉनेस्ट डॉट कॉम असे ठेवण्यात आले आहे.