आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Landen's Son In Law Suleman Court Jugdment Pending

लादेनचा जावई सुलेमान घैतबाबतचा न्यायालयीन निर्णय लांबणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - दहशतवाद्यांचा खात्मा झालेला म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या जावयासंबंधीच्या खटल्याच्या निवाड्यात दिरंगाई होण्याची शक्यता आहे. त्याला कारण अमेरिकी अर्थसंकल्पातील कपात ठरली आहे.
न्यायालयाने नियुक्त केलेल्या वकिलास मिळणारे मानधन बंद होणार आहे. मार्टिन कोहेन असे या अ‍ॅटर्नीचे नाव आहे. अल -कायदाचे नेटवर्क चालवण्यात सुलेमान अबू घैत याचा हात होता. घैत हा लादेनचा जावई असल्याचे सांगण्यात येते. परंतु मानधन कपातीमुळे अ‍ॅटर्नीने सप्टेंबरमध्ये होणाºया सुनावणीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मॅनहटनमधील सुनावणीच्या काळात घैत काहीही बोलला नाही. त्याने केवळ सुनावणीची कारवाई ऐकली. इंग्लिशमधील कारवाई दुभाष्याच्या मदतीने त्याने समजावून घेतली. 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे 3 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला अल कायदाने केला होता. खटल्याची सुनावणी इतरत्र हलवण्यात यावी, अशी मागणी कोहेन यांच्या टीमने न्यायाधीशांकडे केली होती. न्यूयॉकमधील न्यायविषयक वातावरणाचा विचार केल्यास सुनावणी इतरत्र व्हावी, असे आम्हाला वाटते. नि:पक्ष सुनावणी होण्याची शक्यताही कोहेन यांनी फेटाळून लावली.