आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लान्स आर्मस्ट्राँगची पुस्तके फिक्‍शन विभागात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लान्स आर्मस्ट्राँग यांनी टीव्ही अँकर ओप्रा विनफ्रेच्या कार्यक्रमात डोपिंग केल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर ऑस्ट्रियातील एका लायब्ररीत एक नोटीस लावण्यात आली. त्यात लिहिले की, लान्सवर लिहिलेली सर्व पुस्तके जसे की, आर्मस्ट्राँग वर्ल्ड्स ग्रेटेस्ट चॅम्पियन, लान्स आर्मस्ट्राँग परफॉर्मंस प्रोग्राम इत्यादी लवकरच फिक्शन कॅटेगरीत ठेवली जातील. लायब्ररीचे मालक डेन मुर्रे यांनी ही नोटीस ट्विटरवर पोस्ट केली. काही वेळातच ती सगळीकडे पसरली आणि माध्यमांमध्ये त्याची बातमी झळकली. त्यानंतर डेन यांना लायब्ररीतर्फे दिलगिरी व्यक्त करावी लागली, कारण कोणतीही लायब्ररी अशा प्रकारे पुस्तके स्वत:च्या मर्जीप्रमाणे एखाद्या श्रेणीत विभागू शकत नाही.

Bneatorama.com