आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानच्या राजधानीत आत्मघाती हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबुल - अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथील पोलिस मुख्यालयाला टारगेट करुन आत्मघाती हल्ला करण्यात आला. या परिसरात अनेक देशांचे दुतावस आहेत. फ्रांस दुतावासाजवळ ही घटना घडली. ज्या ठिकाणी आत्मघाती हल्ला झाला त्याच्या जवळच अफगाणिस्तानचे गृहमंत्रालय आहे. या हल्यातील जीवितहानीची माहिती अद्याप मिळालेली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात थोड्या-थोड्या वेळाने गोळीबाराचा आवाज येत आहे. या हल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कोणीही घेतलेली नाही.