आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्समध्ये सर्वात लांब मगरीचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मनिला - जगातील सर्वात लांब खा-या पाण्यातील मगरीचा फिलिपाइन्समध्ये मृत्यू झाला. 17 महिन्यांपूर्वी या संशयित नरभक्षक मगरीला पकडून तिचे पर्यटकांसाठी प्रदर्शन केले जात होते. लोलाँग मगरीची लांबी 6.17 मीटर (20.24 फूट) मोजली होती. रविवारी रात्री मगरीचा अज्ञात आजाराने बुनवान शहरात मृत्यू झाला.

आमच्या शहरासाठी ही दु:खद घटना आहे. मगरीच्या अवशेषाचे जतन करण्याचा आमचा विचार आहे, असे शहराच्या प्रवक्त्या वेलिंदा इलोर्दे यांनी सांगितले. या घटनेमुळे फिलिपाइन्समधील मगरींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.देशातील वन्यजीव हक्क गटाने मगरीची सुटका करण्याची मागणी केली होती. मगरीची सुटका केल्यास ग्रामस्थ तिला ठार करतील, अशी भीती तिची देखभाल करणा-या नागरिकाने व्यक्त केली होती.