आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्याच्या ऊर्जेने रात्रीदेखील तयार होणार वीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केविन स्मिथ यांनी वीजगृहांची निर्मिती करत जीवन घालवले आहे, मात्र अमेरिकेच्या लास वेगास आणि रेनो, नेवादाच्या दरम्यान पसरलेल्या वाळवंटात अब्जावधी रुपये खर्चून बनत असलेला क्रीसेंट ड्यून प्लांट साधेसुधा नाही. स्मिथ एका वजनदार स्टील टाकीकडे बोट दाखवत सांगतात, यात 550 अंश फॅरनहाइटवर सात कोटी पाउंड वितळलेले मीठ ठेवले जाऊ शकते.

क्रीसेंट ड्यून्स एक सौरऊर्जा प्रकल्प आहे. हा तीन लाख साठ आरशांनी शक्ती प्राप्त करतो. हे आरसे मिठाला 1050 अंश फॅरनहाइटपर्यंत तापवण्यासाठी सूर्याची किरणे प्रक्षेपित करतो. इतक्या प्रचंड तापमानामुळे प्रकल्पाला रॉकेट सायंटिस्टकडून डिझाइन करावे लागले आहे. गरम मीठ एका टाकीत ठेवतात. त्याच्या उष्णतेने वाफेचे टर्बाइन चालतील आणि कोणत्याही क्षणी वीज निर्माण करतील. त्यातून सूर्यास्तानंतर रात्रीदेखील वीज तयार होईल. सोलर रिझर्व्ह कंपनीचे सीईओ स्मिथ सांगतात, रात्रीत सौरऊर्जेचा अर्थ म्हणजे ही एक नवी दुनिया आहे. सौरऊर्जा साठवणार्‍या आपल्यासारख्या या पहिल्या वीजगृहापासून 75 घरांना रात्री किंवा दिवसा वीज मिळेल. अमेरिकेत गेल्या पाच वर्षांत पर्यावरणाप्रती अनुकूल अक्षय ऊर्जेची निर्मिती वाढली आहे. पवनऊर्जा तिप्पट आणि सौरऊर्जेच्या क्षमतेत सोळापट वाढ झाली आहे. 2008 मध्ये अमेरिकेत सौरऊर्जा उद्योग जवळपास अस्तित्वातच नव्हता. राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ओबामांनी स्वच्छ विजेसाठी 90 अब्ज डॉलरचे पॅकेज मंजूर केले.

अमेरिकेतील 39 टक्के वीज कोळशावर चालणार्‍या वीजगृहांतून मिळते. फ्रेकिंगमधून निघणार्‍या वायूतून 27 टक्के वीज उत्पादन होते, परंतु 2014च्या पूर्वी तीन महिन्यांत 90 टक्के वीजप्रकल्प पवन आणि सौरऊर्जेशी संबंधित होते. चाळीस वर्षांपूर्वी सौरऊर्जा पॅनल्सची किंमत 75 डॉलर प्रतिवॉट होती. अमेरिकेसह चीन, सौदी अरब, चिली, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक देशांत सौर आणि पवन ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जात आहे. क्रीसेंट ड्यून्स स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीत ग्लोबल मॉडेल बनू शकते.