आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Laser Death Test Can Tell You When You Are Going To Die

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूची घटिका समजण्यासाठी लेझर टेस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आपला मृत्यू कधी होणार, याचे भाकीत करणे शक्य होणार असल्याचा दावा ब्रिटनच्या संशोधकांनी केला आहे. त्यासाठी एक चाचणी करावी लागेल. चाचणीनंतर आपल्या जीवनाची किती वर्षे बाकी आहेत, हे समजू शकणार आहे. जगात पहिल्यांदाच मृत्यू सांगणार्‍या शास्त्रीय चाचणीचा दावा करण्यात आला आहे.

लान्सेस्टर विद्यापीठाचे प्रोफेसर अनेटा स्टेफानोवास्का, पीटर मॅकक्लिन्टॉक यांनी ही प्रक्रिया विकसित केली आहे. हे दोघे भौतिकशास्त्राचे प्रोफेसर आहेत. त्वचेच्या आतल्या स्तराशी संबंधित एन्डोथिलिअल पेशींचा अभ्यास करून संशोधकांनी ही प्रक्रिया विकसित केली आहे. शास्त्रीय विश्लेषणासाठी पेशीतील कंपने महत्त्वाची ठरतात. त्यातून मृत्यूपूर्वीच्या जगण्याच्या वयाचे गणित काढता येऊ शकते. या शिवाय कर्करोग व स्मृतिभ्रंशाच्या आजाराचीही चाचणी केली जाऊ शकते. रक्तवाहिन्या तसेच कोशिकांचेही सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया वेदनारहित आहे. ही व्यवस्था बाजारपेठेत उपलब्ध होण्यासाठी किमान तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर ही चाचणी जनरल प्रॅक्टिसमध्ये उपयोगात आणली जाऊ शकते. चाचणीच्या दृष्टीने आम्ही लवकरच अधिकाधिक डाटा साठवण्याची व्यवस्था विकसित करत आहोत. त्यातून प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची पडताळणी करता येऊ शकेल. त्यानंतरच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात शिल्लक राहिलेली वर्षे सांगता येणार आहेत, असे स्टेफानोवास्का यांचे म्हणणे आहे.

कशी आहे चाचणी ?
मानवी त्वचेच्या थराच्या पृष्ठभागावर लेझर पल्सचा वापर करण्यात येतो. त्यासाठी एक मनगटी घड्याळीसारखे उपकरण तयार करण्यात आले आहे. ते उपकरण त्वचेवर लावले जाते. कालपरत्वे व्यक्तीच्या शरीराची झीज कशी होईल, याचे विश्लेषण या उपकरणातून करण्यात येते.