आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अ‍ॅपलने लाँच केला सर्वात स्वस्त iPhone

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - अ‍ॅपलने पहिल्यांदाच एकाच वेळी आयफोनची दोन मॉडेल्स लाँच केली आहेत. पहिले आहे आयफोन-5 एस, दुसरे आयफोन-5 सी. प्लॅस्टिक बॉडी असलेला हा फोन तुलनेत स्वस्त आहे. आयफोन-5एस तीन रंगांत तर 5 सी हा पाच रंगांत आहे. आयफोन-5 एस आधीच्या मॉडेल्सपेक्षा दुप्पट वेगवान असल्याचे कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी फिल शिलर यांनी सांगितले. कंपनीचा व्यवसाय इतका वाढला आहे की यावेळी दोन आयफोन लाँच करावे लागेल, असे ते म्हणाले.

आयफोन-5सीच्या किंमती 6,300 ते 13 हजार रुपयांदरम्यान असेल.
आयफोन-5 एसची किंमत 13 ते 26 हजारांदरम्यान असेल. त्यांची बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही किंमत अमेरिकेत दोन वर्षांच्या कॉँट्रॅक्टसाठी असेल.
16 जीबी : 6300 रुपये, 32 जीबी : 13000 रुपये किंमत असणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, Iphone 5c आणि Iphone 5s