आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आइसलँड : दीड किमी लांब, १६५ फूट उंचीचा ज्वालामुखी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आइसलँडच्या होलूहुरान लाव्हा फील्डमध्ये सोमवारी एका ज्वालामुखीचा स्फोट झाला. हा परिसर डिंगुजुजोकूल हिमनगापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. आइसलँडमध्ये ज्वालामुखीची १९० किलोमीटर लांब आणि २५ किलोमीटर रुंद कडा आहे. या ठिकाणी मागच्या दोन आठवड्यांत सुमारे एक हजार वेळा भूकंपाचे हादरे बसले आहेत. त्यामुळे हे ज्वालामुखी सक्रिय झाले आहेत.

इक्वेडोरच्या बनोस भागातील तुंगराहुआच्या ज्वालामुखीचाही स्फोट झाला आहे. सोबतच्या छायाचित्रात स्फोट आणि खाली गावातील प्रकाश दिसत आहे. स्फोटानंतर गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
मागच्या २४ तासांत चार अन्य ज्वालामुखींचा स्फोट
१. झुपानोवस्की : रशियाच्या कामचाटकामधील १७ हजार फूट उंचीच्या ज्वालामुखीचा स्फोट.
२. आसो : जपानमधील ६ हजार फूट उंचीच्या ज्वालामुखीतही कमी तीव्रतेचा स्फोट.
३. निशिनो -शिमा : जपानमधील हा ज्वालामुखी नुकताच समुद्रातळाच्या आतून बाहेर आला आहे. हा आतापर्यंत दीड किमी लांब आणि ४०० मीटर रुंद असून यात सतत स्फोट होत आहेत. ४. सकुराजिमा : जपानमधील या १३ हजार फूट उंचीच्या ज्वालामुखीचा मागच्या ३० तासांत १० वेळा स्फोट झाला.