आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest International News In Hindi Egypt Sentences 529 Muslim Brotherhood Members To Death

इजिप्तमध्ये 529 मुर्सी समर्थकांना कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहिरा - इजिप्तचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुर्सी यांच्या 529 समर्थकांना मिस्त्रमधील एका कोर्टाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सगळ्यांवर मिन्यामध्ये मतया पोलिस ठाण्‍याचे उपनिरिक्षक मुस्तफा अल अतर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या अारोपावरून 529 समर्थकांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. कोर्टाने बचावाची संधी दिली नसल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना गेल्या वर्षी अटक केल्यावर स्थानिक तपास यंत्रणांनी मोर्सी समर्थकांवरही कारवाईचा बडगा उगारला होता. मोर्सी यांच्या अटकेनंतर मुस्लिम ब्रदरहूडमधील समर्थकांनी रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान मोर्सी समर्थकांनी सुरक्षा यंत्रणांच्या शि‍बिरांवर हल्लाबोल केला होता.

याप्रकरणी सुमारे बाराशे मोर्सी समर्थकांवर इजिप्तमधील एका न्यायालयात खटला दाखल करण्‍यात आला होता. यापैकी 529 जणांना कोर्टाने सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली तर उर्वरित आरोपींना उद्या मंगळवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान, जगात पहिल्यांदा एकढ्या आरोपींना एकदाच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.