आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किव्हवर ताबा घेऊ; पुतीन यांची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को/ किएव्ह - युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा पाश्चिमात्त्य देशांना धमकी दिली आहे. आपण ठरवल्यास दोन आठवड्यांत युक्रेनची राजधानी किएव्हवर ताबा घेऊ शकतो,असे त्यांनी म्हटले आहे. त्याआधी रशियाकडे आण्विक शक्ती आहे. पािश्चमात्त्य देशांनी वाटे जाऊ नये, असा इशारा त्यांनी दिला होता.
असे असले तरी राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे पुतीन यांच्या सल्लागाराने म्हटले आहे. अन्य सल्लागाराने त्यांचे वक्तव्य योग्य ठरवले आहे. इटलीचे वृत्तपत्र ला रिपब्लिकने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युरोपीय संघाचे अध्यक्ष जोस मॅनुअल बरोसो यांना धमकी दिल्याचा उल्लेख आहे. बरोसो यांनी साेमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पाेरोशेंको यांना ही माहिती दिली. याच्या प्रतिउत्तरादाखल नाटोचे सरचिटणीस फाॅग रासमुसेन यांनी रशियाने हल्ला केल्यास नाटोचे ४००० जवान उत्तर देतील, असे बजावले आहे. रशियाच्या एका वरिष्ठ अिधकाऱ्याने मंगळवारी नाटो हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आहे. रशिया आपल्या बचावाचे धोरण अवलंबित असल्याचे त्यंानी सांिगतले.

युरोपीय संघ निर्बंध लादू शकते
युरोपीयसंघाचे परराष्ट्रमंत्री रशियाविरुद्ध नवे आिण आणखी कठोर निर्बंध लादण्याच्या विचारात आहे. त्यांना रशियाकडून मिळणारा गॅस पुरवठा बंद होण्याचा धोका वाटतो.
शांतता चर्चेची मागणी
रशियनसमर्थकांनी पहिल्यांदाच काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे मंगळवारी िदसून आले. आम्ही युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. पूर्वेकडील रशियन भाषिक लोकांचा प्रदेशाचा ितढा सोडवण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य दिशेने प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी शांती चर्चा घडवून आणली गेली पाहिजे.