आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Aap Visa Scam London News In Marathi, Divyamarathi

लोका सांगे..: ‘आप’ही घोटाळेबाजच; बीबीसीकडून भंडाफोड, विद्यार्थ्यांची व्हिसात हेराफेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतातील राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांवर आगपाखड करणार्‍या आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्त्यांचा ब्रिटनमधील विद्यार्थी व्हिसा घोटाळ्यात सहभाग असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बीबीसीने केला आहे.

ब्रिटनमधील ‘आप’च्या एक कार्यकर्त्या आणि स्टुडंटवे एज्युकेशनच्या संचालिका वरिंदर बाजराह या एका विद्यार्थ्याला प्रत्यक्ष परीक्षा न देताही त्या कशा अनिवार्य इंग्रजी भाषेचे प्रमाणपत्र मिळवून देऊ शकतात, हे सांगत असल्याचा पर्दाफाश बीबीसीने ‘पॅनोरमा’ या शोधपत्रकारितेवर आधारित कार्यक्रमात केला आहे.

ब्रिटनमधीलच ‘आप’चे अन्य एक कार्यकर्ते आणि स्टुडंटवेचे माजी संचालक हेमंत कुमार हे एका बंद लिफाफ्यात शैक्षणिक पात्रतेची बनावट कागदपत्रे विद्यार्थ्यांना देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आम आदमी पार्टीची ही घोटाळेबाजी उघडकीस आल्यानंतर मात्र हे दोघे जण ‘आप’चे कार्यकर्ते असल्याची आपणाला माहितीच नसल्याचा पवित्रा ‘आप’च्या ब्रिटन शाखेने घेतला आहे.

‘आप’च्या कार्यकर्त्यांचा हा घोटाळा उघडकीस आणणारा ‘पॅनोरमा’ कार्यक्रम मंगळवारी बीबीसीवर दाखवण्यात आला. ‘केवळ छायाचित्र तुमचे असेल’, असे वरिंदर बाजराह त्या विद्यार्थ्याला सांगत असल्याची व्हिडिओफीतच या कार्यक्रमात दाखवण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्याला लंडनच्या इडन कॉलेज इंटरनॅशनलमध्ये बनावट परीक्षेसाठी पाठवण्यात आल्याचेही या कार्यक्रमात दाखवण्यात आले आहे.

केजरीवाल तुम्हीसुद्धा ..?
‘आप’चा अंग झटकण्याचा प्रयत्न

बाजराह या ब्रिटनमधील आपच्या प्रमुख सदस्य असून हा घोटाळा उघड होताच आपच्या वेबसाइटवरून त्यांचे आणि हेमंतकुमार यांचे नाव आणि छायाचित्र काढून टाकण्यात आले आहे आणि ते ‘आप’चे कार्यकर्ते आहेत की नाही हे पाहावे लागेल, असा पवित्रा पक्षाच्या ब्रिटन शाखेने घेतला आहे.

ते ‘आप’चेच कार्यकर्ते
बाजराह आणि हेमंतकुमार हे आपचे कार्यकर्ते नसल्याचा दावा ‘आप’ची ब्रिटिश शाखा करत असली तरी हे दोघेही आपचेच कार्यकर्ते आहेत, असा दावा ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीने (ओएफबीजेपी) केला आणि पुरावा म्हणून aamadmiparty-uk.org या वेबसाइटवरील त्यांची छायाचित्रेही सादर केली. ओएफबीजेपीने या भ्रष्ट वर्तनाचा धिक्कार केला असून अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी केवळ लोकांनाच उपदेश देऊ नये, तर स्वत:ही तसे वर्तन करावे, असे म्हटले आहे.

जगातील सवरेत्तम यंत्रणेला ‘आप’चा बट्टा
इंग्लिश टेस्टिंग सर्व्हिसेस (ईएसटी ) ही इंग्रजीची चाचणी घेणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीमार्फतच ब्रिटनमधील विद्यार्थी व्हिसासाठी अनिवार्य असलेली इंग्रजी चाचणी परीक्षा घेण्यात येते. मात्र ब्रिटनमधील ‘आप’चे प्रमुख कार्यकर्तेच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देत असल्याचा भंडाफोड बीबीसीने केला आहे.

परीक्षा स्थगित
ब्रिटनमधील विद्यार्थी व्हिसा व्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात फसवणूक होत असल्याचे ‘पॅनोरमा’च्या स्टिंगमध्ये उघडकीस येताच ब्रिटन सरकारने व्हिसासाठी अत्यावश्यक असलेली इंग्रजी भाषा परीक्षाच रद्द करून टाकली आहे. घोटाळ्यात सहभागी दोन महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमका घोटाळा काय?
ज्या विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये राहण्याची इच्छा आहे; परंतु स्थलांतर परीक्षा उत्तीर्ण होण्यास पात्र ते पात्र नाहीत, अशा विद्यार्थ्यांऐवजी दुसर्‍यालाच परीक्षा आणि मुलाखतीला पाठवले जाते आणि विद्यार्थी व्हिसा मिळवून दिला जातो. परदेशातून येणार्‍या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करून देऊन त्यांना बनावट कागदपत्रांआधारे विद्यार्थी व्हिसा मिळवून देणार्‍या एजंटांचे मोठे रॅकेटच ब्रिटनमध्ये असून त्यात ‘आप’चे कार्यकर्ते सहभागी आहेत.