आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Fast & Furious Star Paul Walker Dead In Fiery Car Wreck

छायाचित्रातून पाहा किती भीषण ठरली टेस्ट ड्राइव्ह, हॉलिवूड स्टार पॉल वॉकरचा जागेवरच मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फास्‍ट अँड फ्युरियस' चित्रपटांच्या सीरीजमधून जगभर प्रसिद्ध झालेला हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकर याचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना दक्षिण कॅलिफोर्नियातील सँटा क्‍लॅरिटा येथे घडली. चाळीस वर्षीय वॉकर यांच्या कार अतिशय वेगात होती त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारच्या ठिक-या उडाल्या. अपघातानंतरचे दृष्य ह्रदय हेलावून सोडणारे होते.
वॉकर एका कार शोमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते. हा शो चक्रीवादळातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी आयोजित करण्यात आला होता. वॉकर आणि त्याचा एक मित्र पोर्श जीटी कारच्या टेस्ट ड्राइव्ह साठी निघाले होते. तेव्हा हा अपघात झाला. यात वॉकर यांच्यासह त्यांच्या मित्राचाही मृत्यू झाला आहे.
छायाचित्रातून पाहा किती भीषण असेल अपघात...