आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Incredible Mile Long Floating CITY Freedom Ship

समुद्रात तरंगणारे जगातील पहिले शहर! एक मैल लांब, 25 मजले, 50 हजार खोल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अमेरिकेची एक कंपनी असे जहाज तयार करण्याच्या तयारीला लागली आहे जे जगातील आठवे आश्चर्य ठरेल. या जहाजाचे कॉम्प्यूटराइज्ड छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे पाहिले तर जहाज कसे असेल याचा अंदाज लावता येतो. फ्लोरिडा येथील फ्रिडम शिप इंटरनॅशनल कंपनी हे जहाज तयार करणार आहे. या जहाजाचे नाव फ्रिडम शिप असे ठेवण्यात आले आहे. याची लांबी एक मैल आणि त्यावर 25 मजले असणार आहेत. यात शाळा, पार्क, हॉस्पिटल, रन-वे, मॉल, कॅसिनो यासारख्या जगातील अत्याधूनिक शहरात असतात त्याप्रमाणे सुविधा असणार आहेत.
फ्रिडम शिप इंटरनॅशनलचे डायरेक्टर रॉजर एम गूच यांचा दावा आहे की, फ्रिडम शिप हे जगातील सर्वात मोठे जहाज असेल. त्याला पाण्यावर तरंगणारे शहर म्हटले तरी वावगे होणार नाही. मात्र रॉजर यांचे हे स्वप्न अतिशय महागडे आहे. सध्या ते यासाठी लागणारे पैसे जमा करत आहेत. फ्रिडम शिप तयार करण्यासाठी 6 अब्ज डॉलर पेक्षा जास्त खर्च येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून असलेली आर्थिक मंदी देखील या स्वप्नात आडथळे आणत आहे. सहा महिन्यात आम्ही या प्रोजेक्टमध्ये रुचू असलेल्या काही लोकांची भेट घेतली आणि एक अब्ज डॉलर जमा झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहोत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'फ्रिडम शिप' कसे असेल..