आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Hong Kong Kills 20000 Chickens Over Bird Flu Fears

हॉंगकॉंगमध्ये बर्ड फ्ल्यूची दहशत; 20 हजार कोंबड्यांची कत्तल, चिकन झाले हद्दपार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉंगकॉंग- हॉंगकॉंगमध्ये बर्ड फ्ल्यूने थैमान घातले आहे. चीनमधील मेनलॅंडमधून आयात करण्‍यात आलेल्या कोंबड्यांत एच 7 एन 9 सारखे घातक विषाणू आढळून आले आहे. त्यानंतर सुमारे 20 हजार कोंबड्यांची कत्तल करण्यात आली. हॉटेलमधून चिकन हद्दपार झाले आहे.

चिनी नवे वर्ष (लूनर न्यू ईयर) तोंडावर आले असतानाच हॉंगकॉंमध्ये बर्ड फ्ल्यूची दहशत पसरली आहे. नव वर्षाच्या मेजवानीच्या मेनूतून चिकनसह चिकनपासून तयार होणारे पदार्थ गायब होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत दोन जणांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. हे दोघे चीनमधून परतले होते.

चीनमध्ये बर्ड फ्ल्यूचे 102 रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 22 जणांचा मृत्यु झाला आहे. शेन जियांग प्रांतात बर्ड फ्ल्यूचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे. तेथील प्रमुख शहरातील चिकन मार्केट बंद करण्यात आले आहेत.

हाँगकाँगमधील चेउंग-शा-वान मार्केट आता 21 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मृत शेकडो कोंबड्यांची मंगळवारी विल्हेवाट लावली. जिवंत कोंबड्यांचीही कत्तल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे हॉंगकॉंगमधील चिकन मार्केटचे सुमारे 50 लाख डॉलरचे नुकसान झाले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून छायाचित्रांतून पाहा, बर्ड फ्ल्यूची दहशत...