बार्सिलोना एअरपोर्टवर दोन विमानांची भीषण धडक होणार होती. परंतु, एका विमानाच्या वैमानिकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने ही धडक थोडक्यात चुकली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून इंटरनेटवर व्हिडिओच्या माध्यमातून झळकली आहे.
यू टेयर एअरलाइन्सचे विमान मॉस्को येथून बार्सिलोनाला येत होते. बार्सिलोना विमानतळावर लॅंडिंग करताना एक दुसरे विमान अचानक रनवेवर आले. त्यामुळे दोन्ही विमानांची भीषण अशी टक्कर झाली असती. परंतु, यू टेयर विमानाच्या वैमानिकाने प्रसंगावधान दाखविल्याने शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर जाहीर झाल्यावर चक्क 3,162,735 युजर्सनी तो बघितला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा व्हिडिओ...