आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Hindi ISIS Recruiting People Through Social Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS कडून इंटरनेटचा गैरवापर, छायाचित्रे-व्हिडिओंतून दहशतवादी घडवण्यावर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इराकमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धाची चर्चा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरियाचे (आयएसआयएस) दहशतवादी इंटरनेटचा गैरवापर करीत आहेत. विशेष म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर तरुणांना दहशतवादी बनवण्‍याचा प्रयत्न केला जात आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून 'जिहाद'मध्ये सहभागी होण्याबाबत तरुणाईला आवाहन करण्यात येत आहे. अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवून भावना भडकवण्याचे काम केले जात आहे. 'आयएसआयएस'द्वारा 'नो लाइफ विदाउट जिहाद' या शिर्षकाखाली इंटरनेटवर छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहेत. सध्या ही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. आयएसआयएसला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचेही तरुणाईला खोटे सांगितले जात आहे.

सीरियामधील ब्रिटिश युवक अबु अब्दुल्लाह अल ब्रितानी 'Ask.fm' या संकेतस्थळाचा माध्यमातून तरुणाईला आकर्षित करत आहे. जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी स्मार्टफोन आवश्यक असल्याचे सांगितले आहे. स्मार्टफोनवरून इंटरनेट अभियान मोठ्याप्रमाणात राबविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही अबु अब्दुल्लाह अल ब्रितानी यांनी म्हटले आहे.

आयएसआयएसने गेल्या एप्रिलमध्येच अँड्राईड अॅप विकसित केले होते. हे अॅप गूगल प्ले स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. मात्र, 'गूगल'वरून हे अॅप हटवण्यात आले असले तरी 'ट्विटर'ने आतापर्यत 'आयएसआयएस'वर कोणतीही बंदी घातलेली दिसत नाही.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, इंटरनेटच्या माध्यमातून कशा प्रकारे संदेश प्रसारित करण्‍याचे काम करत आहेत आयएसआयएसचे दहशतवादी...