आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Indian Prisoner Found Dead In Pakistan

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय कैद्याचा मृत्यू, हत्येची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानच्या तुरुंगात एका भारतीय कैद्याचा मृत्यू झाला आहे. कराचीतील लांधी तुरुंगात आज सकाळी किशोर भगवान या भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तुरुंगात त्याची हत्या झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुरुंग अधिका-यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे.
2013 मध्ये भारतीय कैदी सरबजीतची तुरुंगातील इतर कैद्यांनी हत्या केली होती. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या तुरुंगात एका भारतीयाचा मृत्यू झाल्याने त्यावरुन प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.
किशोर भगवान 2013 मध्ये तुरुंगातून बाहेर पडला होता मात्र, त्याला पुन्हा अटक करण्यात आली आणि तुरुंगात पाठवण्यात आले होते.
पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या 224 कैदी दिवाणी दाव्यांमध्ये तुरुंगवास भोगत आहेत. अनेक अहवलातून पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीयांना अत्यंत वाईट अवस्थेत ठेवले जाते असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरबजीतसिंगचा मृ्त्यू
एप्रिल 2013 मध्ये लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात सहा कैद्यांनी भारतीय कैदी सरबजीतसिंगवर विटा आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. लाहोरच्या जिना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सरबजीतवर 1990 मध्ये पाकिस्तानातील लाहोर आणि फैसलाबाद येथे चार बॉम्ब स्फोट घडविल्याचा आरोप होता. लाहोरच्या एका न्यायालयाने हेरगिरी आणि बॉम्बस्फोटाच्या आरोपात त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मार्च 2006 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने त्याची दया याचिका फेटाळत मृत्यूदंडीची शिक्षा कायम ठेवली होती.
भारतीय तुरुंगातही पाकिस्तानी कैद्याचा मृत्यू
सरबजीतच्या हत्येनंतर भारतीय तुरुंगातील पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह हक याचा मृत्यू झाला होता. जम्मूच्या कोट बलवाल तुरुंगात हक 17 वर्षे होता. एका माजी सैनिक कैद्याच्या हल्यात तो जखमी झाला होता. या घटनेवर पाकिस्तान सरकारने कडक भूमिका घेत जाणिवपूर्वक सनाउल्लाहला मारण्यात आल्याचा आरोप केला होता. त्याच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी आंतरराष्ट्री संस्थेमार्फत करण्याचीही मागणी पाकिस्तानने केली होती.
छायाचित्र - कराचीच्या लांधी तुरुंगाबाहेरील.