आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi, Michael Jackson Used Code Words For Making Sexual Relation

शारीरिक संबंध प्रस्थापित करण्‍यापूर्वी \'कोड वर्ड\'मध्ये बोलायचा मायकल जॅक्सन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस- दिवंगत पॉप सिंगर मायकल जॅक्सनबाबत आणखी एक खळबळजनक खुलासा करण्‍यात आला आहे. तो म्हणजे, मायकल जॅक्सन शारीरिक संबंध प्रस्था‍पित करण्‍यासाठी संकेतिक शब्दांचा (कोड वर्ड) वापर करत होता. विशेष म्हणजे सेक्सबाबत इच्छा दर्शविणार्‍या काही सांकेतिक शब्दांची जॅक्सनने यादीच करून ठेवली होती, असा दावा जेम्स सेफचक यांनी केला आहे.

36 वर्षीय जेम्स सेफचक यांनी यापूर्वी जॅक्सनविरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सेफचक यांच्या वकीलांनी कोर्टात काही दस्ताऐवज दाखल केले आहे. सेफचक यांना जॅक्सनच्या संपत्तीत वाटा मिळावा, अशी मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर 'थ्रिलर हिटमेकर' या गाण्याचा गायक जॅक्सनने सेफचक यांचे जवळपास शंभर वेळा लैंगिक शोषण केल्याचाही गौप्यस्फोट सेफचक यांच्या वकीलांनी केला.
1980 च्या दशकात पेप्सी कंपनीच्या एका जाहिरातमध्ये सेफचक यांनी जॅक्सनसोबत काम केले होते. त्या काळात सेफचक याला जॅक्सनसोबतच रात्र घालवावी लागत होती. दरम्यान, जॅक्सन सेफचक याचा लैंगिक छळ करत असल्याचे कोर्टात सादर करण्यात आलेल्या दस्ताऐवजमध्ये म्हटल्याचे एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी चार सप्टेंबरला होणार आहे.