आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi North Korea Threatens Nuclear Strike On White House

व्हाइट हाऊसवर अणुहल्ला करण्याची उ. कोरियाची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पियॉँगयांग - उत्तर कोरियातील वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी अमेरिकेला व्हाइट हाऊस आणि पेंटागॉनवर अणुहल्ला करण्याची धमकी दिली आहे. दक्षिण आणि उत्तर कोरियादरम्यानच्या तणावासाठी त्यांनी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. उत्तर कोरियातील मिलिटरी जनरल पॉलिटिकल ब्यूरोचे संचालक ह्यांग प्योग सो यांनी 1950-53 मधील कोरियन युद्धाला 61 व्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराच्या एका संमेलनाला संबोधित करताना त्यांनी ही धमकी दिली.
कोरियन पीपल्स आर्मीमध्ये ह्यांग हे व्हाइस मार्शल दर्जाच्या पदावर आहेत. कोरियन बेटांवर दक्षिण कोरिया व अमेरिकेने केलेल्या लष्करी अभ्यासात अमेरिकेतील अणुऊर्र्जेवर आधारित विमानांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर कोरियाने अणू हल्ल्याची धमकी देण्याची ही पहिली घटना नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने लघु आणि मध्यम क्षमतेच्या अणू क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती.