आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Russia\'s Vladimir Putin Recognises Crimea As Nation

क्रिमियाची जनता विलयाच्या बाजूने, सार्वमत अमेरिकेला मंजूर नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिम्फरोपोल - युक्रेनच्या स्वायत्त असलेल्या क्रिमिया प्रांतात झालेल्या सार्वमतात 95.5 टक्के लोकांनी रशियात सामील होण्यासाठी कौल दिला आहे. युक्रेनपासून वेगळे होऊन रशियन फेडरेशनमध्ये सामील होण्यासाठी क्रिमिया आता औपचारिक विनंती करण्याच्या मार्गावर आहे. तर, दुसरीकडे पाश्चात्त्य देश रशियावर नव्याने निर्बंध लादण्याच्या तयारी आहेत.
क्रिमियाचे स्वयंघोषित पंतप्रधान सर्जेइ अस्क्योनोव्ह यांनी सार्वमतास ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. लेनिन चौकात झालेल्या सभेत ते म्हणाले की, आम्ही घरी जात आहोत. क्रिमिया रशियाकडे जात आहे. तातार मुस्लिम समुदाय मात्र सार्वमतापासून लांब राहिला आहे.
रशियन भाषक बहुलभाग असलेल्या क्रिमियाच्या संसदेचे सोमवारी होणार्‍या विशेष अधिवेशनात रशियात सामील होण्याचा ठराव मंजूर होऊ शकतो. पुढील प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही महिने लागू शकतात. मात्र, यास आंतरराष्ट्रीयपातळीवर विरोध आहे. सर्बियापासून स्वतंत्र होण्याच्या कोसोवोच्या 2008मधील निर्णयानंतर आता पुन्हा युरोपचा नकाशा बदलणार आहे.
युरोपियन संघाने सार्वमत बेकायदा असल्याची टीका केली आहे. त्यातील निकालास मान्यता देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्रुसेल्समध्ये होत असलेल्या युरोपियन देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत रशियाविरुद्ध कडक निर्बंध जारी होण्याची शक्यता आहे. यात व्हिसा मनाई, मास्कोतील प्रमुख लोकांच्या मालमत्ता गोठवणे आदीचा समावेश असेल.
उत्साही सहभाग, युरोपियन देशांचा विरोध जारीच
अमेरिका व पाश्चात्त्य देशांच्या कडव्या विरोधानंतरही क्रिमियाच्या संसदेने सार्वमत घेतले आहे. लोकांनी अतिशय उत्साहाने या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी साडेअकराला मतदानास सुरुवात झाली. ही प्रक्रिया 12 तास चालली. मतदानासाठी 1205 केंद्रे स्थापण्यात आले. मतदानावेळी हिंसेच्या घटना घडलेल्या नसल्याचे सार्वमत आयोगाचे प्रमुख मिखाइल मालीशेव यांनी सांगितले. युक्रेनने सार्वमताविषयी निराशा प्रकट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेसमोर आलेल्या निंदा ठरावास रशियाने व्हिटो दाखवला आहे.

पुढील स्लाइडमध्ये,सार्वमत अमेरिकेला कदापि मंजूर नाही