आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Shoe Thrown At Hillary Clinton In Las Vegas In Rally

अमेरिका: हिलरी क्लिंटन यांच्यावर भर सभेत भ‍िरकावला \'बूट\', महिलेचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास- अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर लास वेगास येथील भर सभेत बूट भिरकवण्यात आला. हिलरी क्लिंटन यात थोडक्यात बचावल्या. बूट भिरकावणार्‍या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच स्टेजवरून काळ्या-पिवळ्या रंगाचा एक बूटही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूट ऑफ स्क्रॅप रिसायकलिंग इंडस्ट्रीजच्या बैठकीला हिलरी क्लिंटन उपस्थित झाल्या होत्या. सभेत उपस्थितांना संबोधित करण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. त्या स्टेजवर आल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, हिलरी यांनी स्वत: शांत होऊन झालेला प्रकार हास्यावर नेला. `कुणी माझ्यावर काहीही फेकते आहे. सर्कस कलेतला हा एक भाग आहे का? असा सवाल हिलरी यांनी करताच बॉलरूममध्ये उपस्थितांमध्ये हशा पिकला. यानंतर हिलरी यांनी आपले भाषण पुन्हा सुरू केले.

दरम्यान, हिलरी यांच्यावर बूट फेकणार्‍या महिलेची चौकशी सुरू आहे. या महिलेची माहिती उघड करण्यास सुरक्षा यंत्रणेने नकार दिला आहे.

पुढे पाहा छायाचित्रे...