आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हिमवादळ; 16 जणांचा मृत्यू, तीन हजार उड्डाणे रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये भीषण हिमवादळ आल्याने न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड हिमवृष्टीमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सीचे तपमान उणे 21 आणि न्यूयॉर्कमध्ये उणे 12 अंशांवर गेले आहे. अमेरिकेत परिस्थिती क्षणाक्षणाला हाताबाहेर जात असल्यामुळे प्रशासन बेघारांसाठी निवारे उपलब्ध करुन देण्यासाठी झटत आहे. वॉशिंग्टनमध्ये तर बर्फाचा दोन इंच मोठा थर जमा झाला आहे. तर, फिलाडेल्फिया येथे पाच इंचाचा बर्फाचा चादर पसरली आहे.
या हिमवादळामुळे तीन हजाराहून जास्त विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खराब वातावरणामुळे शुक्रावारी एका 50 वर्षीय महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तिचा मृत्य झाला आहे. रस्त्यावरील बर्फ साफ करणे कर्मचा-यांसाठी मोठी समस्या बनली आहे.
बोस्टनचे गव्हर्नर डेव्हल पॅट्रिक यांनी जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, 'गरज असले तरच लोकांनी घराबाहेर पडावे.'
न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीचे गव्हर्नर म्हणाले, देशात सध्या आणीबाणीसारखी स्थिती आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अमेरिकेची ताजी छायाचित्रे..