आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News ISIS Video Claims To Show Beheading Of British Hostage

ISIS ने व्हिडिओ प्रसारित करुन केला ब्रिटीश नागरिकाचा शिरच्छेद केल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - दहशतवादी संघटना आयएसआयएसने ब्रिटीश नागरिक डेव्हिड हँसचे शिर धडावेगळे केल्याचा दावा केला आहे. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ दहशतवाद्यांवर नजर ठेवणारी वेबसाइट SITE वर उपलब्ध आहे. या व्हिडिओमध्ये मास्क लावलेला एक बंदूकधारी दहशतवादी एका नागरिकाचे शिर कलम करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आयएसआयएस कडून एखाद्या नागरिकाचा शिरच्छेद करण्याची आणि त्याचा व्हिडिओ प्रसारित करण्याची तिसरी घटना आहे.
अमेरिकेच्या सहकार्यांना संदेश
आयएसआयएसने जारी केलेला व्हिडिओ 2 मिनिट 27 सेकंदाचा आहे. त्यात अमेरिकेच्या सहकार्यांना संदेश असे शिर्षक देण्यात आले आहे. आयएसआयएसने त्यांच्या या कारवाईला ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. कारण इराकमधील जिहादींविरोधात अमेरिकेने सुरु केलेल्या युद्धाला त्यांचे सहकार्य आहे.
ब्रिटनला धमकी
व्हिडिओमध्ये ब्रिटनला धमकावताना म्हटले आहे, की तुम्ही स्वतःहून इस्लामिक स्टेटच्या विरोधात अमेरिकेच्या सोबत गेले आहात. तुमच्या आधीच्या पंतप्रधानांनी (माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर) असेच केले होते. तुम्ही त्याचेच अनुकरण केले आहे. ब्रिटीश पंतप्रधानांकडे अमेरिकेला नाही म्हणण्याची ताकद नाही.

पुढील स्लाइडमध्ये, अमेरिकेचे पत्रकार स्टिव्हन सॉटलॉफ यांचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ